पिंपळनेर । पिंपळगांव हे महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेच्या जवळ असलेले साक्री तालुक्याचे गाव. अनेक वर्षांपासून या गावातील नागरिक या गावी आठवडे बाजार भरावा म्हणून प्रयत्नशील होते. नागरिकांची मागणी लक्षात घेत आमदार डी. एस. अहिरे व जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहीते यांच्या प्रयत्नांतुन येथील आठवडे बाजारासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने परवानगी दिली. या आठवडे बाजाराचा शुभारंभ आमदार डी. एस. अहिरे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष दिलीप काकुस्ते,जि. प. सदस्य विलास बीरारीस, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप नांद्रे ,गाजर्या वळवी,दयानियल कुवर ,मगन पवार ,बोवाजी माळवी,सरपंच मेनका चौरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य ,व्यापारी उपस्थित होते.
आमदार निधीतून पाणपोई व बाजारा ओटा बांधण्याचे आश्वासन
प्रास्ताविक गायकवाड गुरुजी यांनी केले. यावेळी आमदार अहिरे यांनी पहिल्याच बाजारास व्यापारी मोठ्या संख्येन आल्याने समाधान व्यक्त केले. बाजार भविष्यात मोठा भरावा यासाठी परिसरातील गावकरी मदत करतील अशी आपेक्षा व्यक्त केली. यापरिसरात तांदूळ व नागली ही पिके मोठ्या प्रमाणावर पिकवली जातात. हा बाजार येत्या काळात चांगला नावारूपास येवून शेतकर्यांना चांगली बाजारपेठ आपल्याच भागात उपलब्ध होयील असे सांगितले. या बाजारात पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आमदार नीधीतुन पाणपोई व बाजार ओटा बांधण्यात येयील असे जाहिर केले. दिलीप काकूस्ते व विलास बीरारीस यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दशपुते यांनी तर ग्रामसेवक ठाकरे यांनी संयोजन केले.