पिंपळगाव बु., बहादरपूर गावाची स्मार्टग्रामसाठी निवड

0

जळगाव। पारोळा तालुक्यातील बहादरपूर गावाला स्मार्टग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते सरपंच ग्रामसेवकांचा गौरव करण्यात आला. पारोळा तालुक्यातील बहादरपूर गावाची स्मार्टग्राम साठी निवड झाली असून तालुक्यातून एकमेव बहादरपूरची निवड झाली आहे. बहादुरपूर सोबतच भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बु. गावाला देखील स्मार्टग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

पर्यावरण संतुलन समृध्द ग्राम योजनेचे रुपांतर करीत स्मार्ट ग्राम योजना सुरु करण्यात आली असून 21 नोव्हेंबर 2016 च्या शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायतने भाग घेतला. स्मार्ट ग्राम अंतर्गत येण्यासाठी लागणार्या तरतुदी बहादरपूरचे ग्रामपंचायतीने काटेकोरपणे पालन केल्या असून त्यात 100 टक्के हगणदारी मुक्त, 100 टक्के 1 ते 33 नमुना संगणीकृत उतारे, पाणी पट्टी 80 टक्के च्या वर जमा; मागील वर्षी एकही फौजदारी गुन्हा दाखल नाही, पूर्ण गाव एलईडी लावून सुशोभिकरण केलेले आहे.