पाचोरा । राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव (हरे) ता. पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शाखा उद्घाटन माजी आमदार दिलीप वाघ यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा प्रवक्ता खलील देशमुख, उपाध्यक्ष रणजित पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे, तालुकाध्यक्ष शालिग्राम मालकर, विठ्ठल गीते, विजय पाटील, भास्कर पाटील, मौजूलाल जैन, राजेंद्र क्षीरसागर, दिलीप जैन, गोरख पाटील, प्रशांत माळी, पंडित तेली, अरुण पाटील, संतोष कुटे, शाखाध्यक्ष सुरेश थोरात, समाधान मालकर आदी.