पाचोरा। तालुक्यातील पिंपळगाव-शिंदाड या जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांना मंजूरी देण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांच्या प्रयत्नाने विकास कामांना मंजूरी मिळाली आहे. 30 लाख 50 हजाराचा निधी विकास कामासाठी मंजुर झाला आहे.
यात दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत पिंपळगाव हरेश्वर येथील शौचालयासाठी 4 लाख, रस्त्यांसाठी 3 लाख, डांभुर्णी भुयारी गटार 3 लाख, अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण 2 लाख, पिंप्री रस्ता कॉक्रीटीकरण 2 लाख, भूमीगत गटार योजना 2 लाख, सार्वे रस्ता कॉक्रीटीकरण 4 लाख, वडगावकडे अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण 3 लाख, भुयारी गटार 1 लाख 50 हजार रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे.