पिंपळगाव-शिंदाड गटात आरोग्य तपासणी

0

पाचोरा। प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव येथुन शिवसेना वर्धापण दिनानिमित्त आमदार किशोर पाटील यांच्या शुभहस्ते मोतीबिंदु मुक्त पाचोरा-भडगाव अभियानाला रूग्णांची चांगला प्रतिसाद दिसून आला.

पिंपळगाव शिंदाड जि.प गटातील सर्व मोतीबिंदुने ग्रस्त रूग्णांनी या मोतीबिंदु मुक्त पाचोरा-भडगाव अभियानामध्ये सहभाग नोंदवुन आपल्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. डोळे तपासणी शिबीराची सुरूवात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते झाली.

परिसरातील 250 रूग्णांचा शिबीरात सहभाग
शिबीरामध्ये सर्व रूग्णांचे डोळे तपासण्यात आले व डोळेंचे विविध त्रासांनी ग्रस्त असलेले रूग्णांची तपासणी करूण योग्य सल्ला व मार्गदर्शन आणि औषध उपचार डॉक्टरांच्या टिमच्या मदतीने करण्यात आले. यावेळी कुरंगी-बांबरूड परिसरातील 250 रूग्णांनी शिबीरात सहभाग नोंदवला. डोळे तपासणी रूग्णांमधून मोतीबिंदु ग्रस्त रूग्णांना अ‍ॅम्बुलन्सने पुढील उपचारासाठी व मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रियासाठी जळगाव कांताई हॉस्पिटलला रवाना करण्यात आले. यावेळी दीपक राजपूत, उद्धव मराठे प्रा.गणेश पाटील, पप्पुदादा राजपुत, रवी गीते, किरण बडगुजर, भगवान पाटील, शेखर डॉक्टर, रमेश तात्या होते. या शिबीराला यशस्वी करण्यासाठी डॉ.संतोष पवार, डॉ.प्रमोद जैन व प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी टिम आणि सर्व आशासेविका यांचे योगदान व अनमोल सहकार्य लाभले.