पिंपळगाव (हरे,)येथे कान, नाक, घसा शिबिर

0

पाचोरा । येथून जवळ असलेल्या पिंपळगाव (हरे) येथे जि.प.सदस्य मधुकर काटे यांच्या वाढदिवसा निमित्त डॉ. शांतिलाल तेली यांच्या दवाखान्यात कान नाक घसा शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा सरचिटणीस सदाशिव आबा पाटील हे होते. यावेळी मधुकर काटे यांचा सत्कार करण्यात आला. कान नाक घसा तज्ञ व जि.प. माजी ऊपाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनी 235 रूग्णांची तपासणी करण्यात आली.

यावेळी प.स सदस्य बन्सीलाल पाटील, शहर अध्यक्ष नंदु सोमवंशी, शहर सरचिटणीस प्रदीप बापू पाटील, प.स.सदस्य रत्नप्रभा पाटील, युवा मोर्चा जिल्हा ऊपाध्यक्ष गोविंद शेलार डॉ. शांतिलाल तेली,सलीम मिस्तरी,कडुबा पाटील, दिपक मोतार आदी उपस्थित होते.