पिंपळनेरला इंडिया फर्निचर दुकानाला आग : लाखोंच्या नुकसानीची भीती

0

पिंपळनेर- येथील सटाणा रोडलगत असलेल्या इंडिया फर्निचर या दुकानाला बुधवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत सर्व फर्निचर जळून खाक झाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिीकांनी आग विझविण्यासाठी मदत केली. मात्र आगीचे स्वरुप मोठे असल्याने ती नियंत्रणात येऊ शकली नाही. सटाणा रोडलगत असिफ युसुफ सय्यद यांच्या मालकीचे यांचे हे दुकान आहे. आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरीकांनी धाव घेऊन आग विझविण्याचे प्रयत्न केले. तसेच अग्निशमन विभागाचा बंबही मागविण्यात आला होता. परंतु तत्पूर्वी आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुकानात विक्रीसाठी ठेवलेले फर्निचरचे सर्व प्रकारचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेबाबत कळताच पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक डी.के. ढुमणे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन याबाबत माहिती घेतली.