पिंपळनेरात सेवानिवृत्त शिक्षकाकडे चोरी ; 70 हजारांच्या रोकडसह पाच तोळे सोने लांबवले

0

पिंपळनेर- शहरातील मोरया सोसायटीतील सेवानिवृत्त शिक्षक विलास ठाकरे यांच्या बंद घराच कुलूप तोडून चोरट्यांनी 70 हजार रुपये रोख, एक सोन्याचा हार, लहान मुलांच्या चार सोन्याच्या अंगठ्या असे पाच तोळ्याचे दागिने लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शेजारी राहणार्‍या नागरीकांच्या लक्षात सोमवारी सकाळी ही घटना आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती विलास ठाकरे यांना दिली. ठाकरे यांनी त्यांच्या जावयाला घटनास्थळी पाठविले. दरम्यान, ठाकरे हे गेल्या दहा दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यातील लासूर येथे राहणार्‍या नातेवाइकांकडे गेले असल्याने घराला कुलूप असल्याची चोरट्यांनी संधी साधली.