पिंपळनेर (दिलीप बोळ) । पिंपळनेर ता.साक्री हि साक्री तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. या ठिकाणी दररोज हजारो-लाखो रूपयाची उलाढाल होत असते. त्याप्रमाणे सध्या या पिंपळनेर शहरात रानमेवा विक्री साठी येत आहे. त्या प्रामुख्याने डोंगराची काळी मैना म्हणजे करवंद, जांभुळ, रामफळ, आंबा आदी सकाळी -सकाळी पश्चिम पट्ट्यातून करवंद,आंबा,जांभूळ, विक्रीसाठी घेऊन आले आहेत.
आवक पाहून भावाची निश्चिती
पिंपळनेर येथून बाहेर गावावून येणारे व्यापारी खरेदी करतात. व गावातील व्यापारी देखील. एखाद्या वेळेस आवक जास्त असते तर एखाद्या वेळेला कमी. जास्त आवक वाढली तर भाव कमी मिळतो, कमी आवक राहीली तर जास्त. आज सकाळी 500 ते 600 रूपयाला एक टोपले(पाटी) ( 12 ते 15 किलो.) वजनी 60 ते 80 रू कीलो. तर मापी 20 रू पावशेर असे दिले जातात.तसेच जांभूळ ची पाटी 1000 ते 1100 रू मिळते. व कीरकोळ विक्री साठी 100 ते 120 रूपये किलोने मिळतात. खरेदीसाठी व्यापारी हे धुळे, साक्री, कासारे, धाडणे, दहिवेल, निजामपुर, मालेगाव, पिंपळनेर, नेर, नंदुरबार, नवापूर, दोडांईचा, कासारे, ताहराबाद येथील व्यापारी खरेदीसाठी येतात.
फळांचा हंगाम सुरू
सध्या हंगाम नुकताच सुरू झाल्याने, 15 ते 20 करवंदाच्या पाटया, 3 त 4 जांभूळच्या, तसेच 15 ते 20 आंब्याच्या पाटया येतात. जांभूळ व करवंद, आंबे जंगलातून सापडतात तर पश्चिम पट्ट्यात अनेक ठिकाणी आंब्याच्या वाडया देखील आहेत. पश्चिम पट्ट्यात करवंदाच्या जाळया जंगल असल्याने मोठया प्रमाणात आहेत. करवंदे एक-एक तोडून गोळा करावे लागतात. त्यामुळे एका दिवसात दोन ते तीन महिलांकडून एक टोपले (10ते 15 किलो) तोडले जात असतील. करवंद तोडणे फार जिकरीचे असल्याचे सांगितले जाते. करवंदाला मोठमोठे काटेअसतात. त्याच्यावर चढून कींवा शिडीच्या सहाय्याने करवंद तोडली जातात. व ती एकत्र गोळा करून सकाळी पिंपळनेर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात.