पिंपळनेर, पिंपळपाडा येथे वृक्ष लागवड ; प्रचार आणि प्रसार

0

पिंपळनेर । राज्य शासनाने दि.1 ते 4 जुलै दरम्यान राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असुन संपुर्ण राज्यभर वृक्ष लागवड मोहिम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात 9 लाख 37 हजार वृक्ष लागवड करण्याचे वनविभागाने निश्चित केले आहे.त्या दृष्टीने या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसारासाठी साक्री तालुक्यांतील पिंपळनेर गावात वनविभागातर्फे नुकतीच वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्ष दिंडीत मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थीसह गावातील नागरीक सहभागी झाले होते. यावेळी पिंपळपाडा ग्रामपंचायत प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षरोपण मोहिमेची जय्यत तयारी : शासनाने संपुर्ण राज्यात वृक्षारोपण मोहिम राबविण्याचे निश्चित केले असुन या मोहिमेची तयारी वेगात सुरू करण्यात आली असुन चांदा ते बांदा चित्रारथाद्वारे मोहिमेबाबत जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत असुन ’लॅडबॅक बुकलेट’ तयार करण्यात आले आहेत.या पार्श्‍वभुमीवर पिंपळनेर, डांगशिरवाडे, परिमंडळ पिंपळपाडा भागात वनविभागातर्फे वृक्षलागवड प्रचार आणि प्रसार कार्यक्रमांतर्गत वृक्ष दिंडी काढण्यात आली.पर्यावरण रक्षणासाठी वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन गरजे आहे. यानुसार राज्य शासनाने 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी वनविभागातर्फे विविध प्रकारे प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. यानुसार पिंपळगावात वृक्षदिंडी काढण्यात आली होती. या वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन व पर्यावरण संर्वधनाच्या घोषणा देवून जनजागृती केली.

नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
वृक्षदिंडीत पिंपळगांव खु माध्यमिक विदयालयाचे विद्यार्थी व मुख्याध्यापक आर.बी.पाटील,शिक्षक आखाडे,राजभोज,देशमुख, शेवाळे, शिंदे, एल. एभ.पाटील,मावची,अहिरे; भोये,तसेच पिंपळनेर येथील वनविभागाचे नितीन बोरकर,डि.के. निकम,विद्या अहिरे,अनिता वळवी,तंटा मुक्तअध्यक्ष राजाराम गायकवाड, सरपंच मेणका चौरे, उपसरपंच सावित्रीबाई मावची, गजानन गायकवाड, सुनिल देसाई,रमेश देसाई,शांताराम गागुर्डे, पोसल्या राउत, हाऊसू गायकवाड, वसंत चौधरी,यांसह शाळेचे विद्यार्थी व नागरीक या वृक्षदिंडीत सहभागी झाले.