साक्री। तालुक्यातील पिपळनेर येथे हात दाखवूनही बस थांबविली नाही म्हणून एकाने बसचालकाच्या कानशिलात लगावल्याची घटना 31मे रोजी घडली.
याप्रकरणी एका तरुणाविरूध्द पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर गावातील साईबाबा कॉलनीतील बस थांब्याच्या पुढे पवन दिलीप जगताप रा. पिंपळनेर याने बसला हात दिला. मात्र बस थांबली नाही, याचा राग येऊन त्याने बस वाहक ज्ञानेश्वर विनायक सोनवणे यांच्या कानशीलात लगावली.