पिंपळनेर येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0

पिंपळनेर । येथील न्हावीहुड्यावर राहणारा सागर सुभाष रायते (वय 21) या महाविद्यालयीन तरूणाने लाटीपाडा धरणाजवळ शेतालगतच्या नाल्यातील बाभळीच्या झाडास नॉयलान दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना शनिवारी सकाळी 8.30. वाजेनंतर निदर्शनास आली. घटनेची पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. ही घटना सकाळी 7 वाजेपूर्वी घडली असल्याचे पोलीसानी सांगितले. सागर रायते याच्या मृत्यूमुळे गावात एकच शोककळा पसरली. त्याच्यावर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी तीन वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तो मुळचा न्याहाळोद येथील रहिवासी होता. त्याच्या पश्चात आई- वडिल, भाऊ, आजी-आजोबा, मामा असा परिवार आहे.

मामाच्या गावाला सागर राहत होता
सागर हा पुणे येथे विद्यापीठात एम एसस्सी च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. शनिवारी तो पुणे येथे द्वितीय वर्षाचे शिक्षणासाठी जाणार होता. त्यापूर्वी तो मोटारसायकलने शेतात गेला. व तिथेच नाल्यात बाभळीच्या झाडास गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. येथील सीताराम विक्रम पगारे यांचा नातू तर योगेश रायते (जिरे) याचा लहान भाऊ होता. सागर हा आई भाऊ यांचेसह मामाच्या गावात पिंपळनेर येथे राहात होता. पुणे विद्यापीठाच्या गैरकारभाराविरूध्द अ.भा.विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळावा म्हणून गत वर्षी सागराने उपोषण केले होते. एक गरीब घरातील हुषार तरूण गेल्याचे दुःख व्यक्त केले. घटनेचा तपास हे कॉ.परदेशी करीत आहे.