चाळीसगाव । तालुक्यातील पिंपळवाड निकुंभ येथील 25 वर्षीय ऊसतोड कामगार महिलेचा उपचारादरम्यान येथील ग्रामीण रूग्णालयात 25 डिसेंबर रोजी सकाळी 9.50 वाजता मृत्यू झाला असून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, चळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड निकुंभ येथील तुळसाबाई सोमनाथ माळी (25) या उस तोड कामगार महिला ऊस तोडणीसाठी परीवारासह आंबेला साखर कारखाना येथे गेल्या होत्या. त्याची प्रकृती खराब असल्याने त्यांना गावी पिंपळवाड निकुंभ येथे आणण्यात आले होते.
25 डिसेंबर रोजी पहाटे त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सकाळी 9 वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरातील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असतांना सकाळी 9.50 वाजता त्यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचा मृत्यू कोणत्या आजारामुळे झाला आहे हे मात्र अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास फौजदार हिरामण तायडे करीत आहेत.