बारामती । पिंपळी लिमटेक ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीच्या मागणीसाठी ग्रामस्थ पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ बारा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. हे उपोषण मागे घ्यावे म्हणून पंचायत समिती प्रशासन प्रयत्न करीत आहेत. मात्र उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना बगल देऊन मुख्य विषय टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. ग्रामपंचायतीत आर्थिक अनियमीतता असल्याचे मान्य केलेले असून देखील कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपोषणकर्ते विचारत आहेत. नव्याने पुन्हा पंचायत समिती प्रशानाने उपोषणकर्त्यांना ठरावाच्या प्रति दिलेल्या
मुळातच ग्रामपंचायतीला ठराव करणे सोपे असून त्यात केलेल्या चुकांची दुरूस्ती आता कशी करायची हाच प्रश्न पडलेला आहे. विशेष म्हणजे ठराव करताना काही विधीनियम असतात. हे ही ग्रामपंचायत विसरून गेली आहे. विषय नं. 6 आणि ठराव क्र. 6 व 7 हे ठराव प्रोसेडींगला घेतल्यानंतर त्याच्यावर एक शिक्का मारलेला आहे. मात्र तारिख आणि शेरे याविषयी अंमलबजावणी याविषयी साशंकता ठेवली आहे. नेमके याचकडे उपोषणकर्त्यांनी लक्ष वेधले आहे. विषय क्र.5 व ठराव क्र. 5 मध्ये केलेल्या वृक्ष लागवडीबाबत लावलेली झाडे व जगलेली झाडे यातील तफावत व प्रत्यक्षातील वस्तूस्थिती याविषयी टिपण करणे, अर्धवटरित्या केलेले आहे.