पिंपरी चिंचवड : पिंपळेगुरव येथील सुदर्शननगर चौकात उभारण्यात येणार्या ग्रेड सेपरेटरच्या कामाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 30) भूमीपूजन करण्यात आले. याठिकाणी सुमारे 28 कोटी रुपये खर्चून 334 मीटर लांब आणि 26.40 मीटर रुंदीचा ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. गेल्यावर्षी स्थायी समितीत सदस्या निर्मला कुटे यांनी पाठपुरावा करून या कामांकरिता निधी मंजूर करून घेतला होता. यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसेविका उषा मुंढे, चंदा लोखंडे, निर्मला कुटे, नगरसेवक शशिकांत कदम, सागर अंघोळकर, समाजिक कार्यकर्ते अरुण पवार, मुकेश पवार, शंकर जगताप, शशिकांत दुधारे, रमेश काशीद, आशीष जाधव, खडसे, बाळासाहेब धावणे, फिरके, नवनाथ भिडे, शिवजी निम्हण, माऊली जगताप, सुदर्शन नगर मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
हे देखील वाचा
आयटी पार्कला जोडणार रस्ता…
नाशिक फाटा ते कोकणे चौक दरम्यान जोडणार्या बीआरटीएस मार्गावर सुदर्शननगर चौकात हे ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. हा बीआरटीएस मार्ग 45 मीटरचा असून, हा रस्ता हिंजवडीतील आयटी पार्कला जोडणारा आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. परिणामी सुदर्शननगर चौकात वाहतूककोंडी होते. हा चौक सिग्नल फ्री करण्याच्या उद्देशाने सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या चौकातील वाहतूक सुरळीत होऊन वाहनचालकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. ग्रेडसेपरेटर उभारण्याच्या कामासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे.