सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग यांची मागणी
सांगवी : येथील पिंपळे गुरव परिसरामध्ये अनेक कामे अजुन रखडलेल्या स्वरूपात दिसत आहेत. येथील वैकुंठ स्मशानभूमीचे काम गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असून नागरिकांची गैरसोय होते आहे. परिसरातील नागरिकांना अंत्यविधीसाठी अन्य ठिकाणी जावे लागते. तसेच अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असून रहदारीसाठी लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यांची आणि स्मशानभूमीची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आली आहे.
अंत्यविधीसाठी इतरत्र जावे लागते
निवेदनात म्हटले आहे की, गेली चार पाच महिन्यांपासुन येथील स्मशानभुमीचे काम सुरू असल्याने पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरातील नागरीकांना अंत्यविधीसाठी इतरत्र जावे लागते. यामुळे सर्व सामान्य नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचबरोबर परिसरातील रस्त्यांची खोदकामे सुरू असल्याने नागरीकांना रहदारीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांच्या कामामुळे बस वाहतुकीत बदल केला आहे. ऐन शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या काळात शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी फिरून जावे लागणार आहे. तर खोदकामामुळे चाकरमानी वर्ग, कामगार यांना कामावर जाण्यासाठी रस्त्यांच्या कामामुळे अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कामामुळे होणारी वहातुककोंडीमुळे अनेकदा नागरीकांना कामावर जाण्यास उशीर होतो.