पिंपळे गुरवमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’

0

अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानतर्फे आयोजन

नवी सांगवी : कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवडच्यावतीने ‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नगरसेविका सीमा चौगुले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंघोळकर, नगरसेविका माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, चंदा लोखंडे, गणेश बँकेचे अध्यक्ष सूर्यकांत गोफणे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, मधुकर लंबाते, राजेंद्र सोनटक्के, उज्ज्वला हाके, निहारिका खोंदले, आशा काळे, मंगल बुधनेर, रुक्मिणी धर्मे, मारुती काळे, सदाशिव पडळकर, काकडे सर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिरु व्हनमाने, कार्याध्यक्ष अजय दुधभाते आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर जानकर, अंबादास पडळकर, विकास माने, संतोष वाघमोडे, अनिल टकले, अनुराज दुधभाते, दिगंबर पेठकर, बंडु लोखंडे, सोम भंडारे, यादवराव गाडेकर, गिरीश देवकाते आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित चौगुले यांनी केले.