पिंपळे गुरवमध्ये घरफोडी; पावणेदोन लाखांचे दागिणे लंपास

0

पिंपळे गुरव : घराची खिडकी तोडून घरातील 1 लाख 76 हजार 831 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी (दि.12) पिंपळेगुरव येथील शिवरामनगरमध्ये घडला. अंकुश वसंत इंगळे (वय 53, रा. पुजा बंगला, शिवराम नगर, पिंपळेगुरव) यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळे सोमवारी (दि. 11) सकाळी दहाच्या सुमारास घराला कुलुप लावून बाहेर गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराची खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले 1 हजार 252 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि 4 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 76 हजार 831 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. मंगळवारी दुपारी पाचच्या सुमारास इंगळे घरी परत आले असता, हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.