पिंपळे गुरवमध्ये ‘तेजस्विनी’ बस सेवा सुरु करावी

0

नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची मागणी

सांगवी : पिंपळे सौदागरमध्ये महिलांसाठी असलेली तेजस्विनी बस सेवा सुरु करावी अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे वाहतुक व्यवस्थापकांकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपळे सौदागरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. 70 टक्के लोकसंख्या ही आयटी क्षेत्रातील नोकरदार वर्ग असून त्यामध्ये महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. महिलांच्या सुरक्षितेतेचा प्राधान्य देत जागतिक महिलादिनानिमित्त पुणे सल्लागर परिवहन महामंडळामार्फत फक्त महिलांसाठी तेजस्विनी ही बससेवा सुरु करण्यात यावी.

महिलांची गैरसोय होणार दूर
येथील अनेक महिला हिंजवडी, पुणे शहर तसेच इतर ठिकाणी नोकरीसाठी प्रवास करीत आहेत. आयटी क्षेत्रात नोकरी करणार्‍या महिलांना रात्री-बेरात्री उशिरा कंपनीमधुन ये-जा करावी लागते. प्रभागातील बर्‍याच मुली शिक्षण व कोचिंग क्लासेससाठी पुण्यातून ये-जा करतात. त्यामुळे महिलांसाठी तेजस्विनी बस सेवा सुरु करावी. ही बस सुरू केल्याने महिला व मुलींची गैरसोय दूर होणार आहे. या बसमुळे अन्य गर्दीच्या बसमध्ये अडकून यावे लागणार नाही.