नवी सांगवी : कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने पिंपळे गुरव येथे आयोजित धनगर समाज बांधवाचा स्नेह मेळावा व महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम नुकताच झाला. पिंपळे गुरव येथील श्रीकृष्ण मंदिरात आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन रासपाच्या सचिव डॉ. उज्ज्वला हाके यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीगणेश बँकेचे अध्यक्ष सूर्यकांत गोफणे, नगरसेविका आशा शेंडगे, माजी नगरसेवक शंकर जगताप, नगरसेवक शशिकांत कदम, सागर अंघोळकर, नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, उषा मुंढे, चंदा लोखंडे, अरुण पवार, मुकुंद कुचेकर, काळूराम कवितके, विजयराज पिसे, अजय दूधभाते, अंबादास पडळकर, अनिल टकले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिरु व्हानमाने, बाळासाहेब काकडे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला सक्षमीकरण करा
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रतिष्ठानची स्थापना व लोगोचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. उज्ज्वला हाके म्हणाल्या, समाजातील प्रत्येक बांधवानी एकजुटीने राहून प्रगती साध्य करावी. महिला सक्षमीकरणासाठी प्रतिष्ठाच्याच्या माध्यमातून प्रयत्न करावा. यावेळी शंकर जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुराज दुधभाते, गिरीश देवकाते, सौरभ भंडारे, यादवराव गाडेकर, प्राजक्ता मासाळ, सीमा शेंडगे, बंडू लोखंडे, रेखा दूधभाते, रेश्मा पडळकर, शंकर जानकर आदींसह सर्व सभासदांनी परिश्रम घेतले. अजित चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. अजय दूधभाते यांनी आभार मानले.