नवी सांगवी : आमदार लक्ष्मण जगताप मित्रपरिवारातर्फे सोमवारपासून दिपावली संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने परिसरातारील नागरिकांना सांगितिक मेजवानी मिळणार आहे. महापालिकेच्या नटसम्राट निळुभाऊ फुले नाट्यगृहात आयोजित केलेली चार दिवसांची दिवाळी पहाट सोमवार धनत्रयोदशी (दि. 5 ) पासून पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होत आहे. यावेळी योगिता गोडबोले, संदिप उबाळे, वैदही फडके आपला गायनाविष्कार सादर करतील. तर योगेश सुपेकर निवेदकाची भूमिका करतील. मंगळवार ( दि.6 ) नरक चतुर्दशीला ज्ञानेश्वर मेश्राम, राधिका अत्रे, सागर म्हात्रे यांचे गायन होईल. संतोशकुमार यावेळी संगीत संयोजक असणार आहेत. बुधवार ( दि.7 ) लक्ष्मीपूजनाला स्वप्नील बांदोडकर, ज्योती गोराने, सोहम गोराने हे आपली गायन कला सादर करतील त्यांचे संगीत सयोजक शाम गोराणे असतील. गुरूवार (दि.8 ) बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा या दिवशी गुरूप्रसाद नानिवडेकर, दशरथ चव्हाण, शर्मिला शिंदे यांच्या गायनाने या संगित महोत्सवाची सांगता होईल.