पिंपळे गुरव परिसरात भरदुपारी घरफोडी !

0

पिंपरी-चिंचवड-पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे गुरव परिसरात भरदिवसा दोन अज्ञात चोरांनी घरफोडी करून ८० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. घोटकर कुटुंबियांच्या घरी ही चोरी झाली आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.

पिंपळे गुरवच्या सृष्टी चौक येथील आशादीप रेसिडेन्सी येथे गजानन सखाराम घोटकर हे राहतात. आज दुपारी त्यांची पत्नी धुंदाबाई या घरी होत्या. थंडी वाजत असल्याने त्या घरापासून हाकेच्या अंतरावर उन्हात बसल्या होत्या, याचीच संधी साधत चोरांनी घरफोडी केली.