पिंपरी-चिंचवड : पिंपळे गुरव येथील जवळकरनगर येथे अज्ञातांनी चार दुचाकी जाळल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी शालोमी डेव्हीड (वय 22. रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मात्र या गाड्या कोणत्या कारणावरुन जाळण्यात आल्या हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. मात्र वारंवार घडणार्या या प्रकारामुळे शहरवासीयांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र या गाड्या कोणत्या कारणावरुन जाळण्यात आल्या हे अद्याप कळू शकलेले नाही.