सांगवी : पिंपळे गुरव येथे आदीयाल स्पोर्ट क्लब व गुरू शोभा सामाजिक व क्रिडा संस्थेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत लाभ घेतला. संस्थेच्यावतीने तरूणांना व्यवसाय, रोजगाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. याच बरोबर सरकारी शुल्कामध्ये पासपोर्ट नोंदणी करण्यात आली. तर संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाच्या पुर्वसंध्येला येथील जयभिम चौकात भिम जलसा या भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसिद्घ गायक आनंद शिंदे यांचे शिष्य निशांत गायकवाड यांनी भिमगीतांचा भिम जलसा हा गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. त्यांनी सोनियाची उगवली सकाळ, जन्मास आले भिम बाळ, सार्या विश्वाला बुद्ध हवा, छाती ठोकु बे सांगु जगाला अशी बाबासाहेबांच्या जीवनावरील गाणी सादर केली. महिलांचा कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांनी गायलेल्या आहे कुणाचं योगदानं, लाल दिव्याच्या गाडीला….या गाण्यास उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी माजी नगरसेविका शोभा आदियाल, राजेंद्र जगताप, शाम जगताप, गौरव टण्णु, अतुल शितोळे, शिवाजी पाडुळे, अमरसिंह आदियाल, राहुल काकडे, शाम जगताप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक म्हस्के यांनी केले तर आभार अमरसिंह आदियाल यांनी मानले.