Cotton worth 70 thousand was stolen from Pimple Shiwar धरणगाव : भूरट्या चोरट्यांनी 70 हजाराचा कापूस लांबवल्याची घटना तालुक्यातील पिंपळे शिवारातील नायर पेट्रोल पंम्पाजवळ घडली. धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांची नजर पांढर्या सोन्याकडे
धरणगाव तालुक्यातील पिंपळे शिवारातील नायर पेट्रोल पंपाजवळील पत्री शेडमध्ये जगदीश शिवाजी पाटील यांनी कापसाचा साठा केला असून चोरट्यांनी संधी साधत 11 रोजी रात्री सुमारे 10 ते 12 क्विंटल वजनाचा 70 हजार रुपये किंमतीचा कापूस लांबवला. या प्रकरणी जगदीश शिवाजी पाटील यांनी गुरुवार, 13 रोजी धरणगाव पोलिसात अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पवार करीत आहेत.