नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी :– पिंपरी चिंचवड शहरातील अत्यंत वेगाने विकसित होत असलेला परिसर म्हणून पिंपळे सौदागरकडे पाहिले जाते. स्मार्टसिटी अंतर्गत येथे सध्या विविध प्रकारची कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस होणारा त्रास लक्षात घेता येथील बहुतेक विकसित झालेले रस्ते ‘युटीडब्ल्यूटी’ पद्धतीने विकसित करावेत व नव्याने ताब्यात येणारे डीपी रोड ‘पीक्यूसी’ पद्धतीने करण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.