पिंपळे सौदागर येथील 9 विद्यार्थ्यांचे स्केटिंगमध्ये यश

0

नगरसेवक नाना काटे यांनी केले अभिनंदन

नवी सांगवी : एशियन रोलर स्पोर्टस् एक्स्पर्टस् कौन्सिल कमिटीद्वारा कासारसाई येथे घेण्यात आलेल्या इंडियाज फास्टेस्ट स्केटर या स्पर्धेत पिंपळे सौदागर येथील ड्रीम झी स्केटिंग प्रशिक्षण अकॅडमीच्या 9 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश मिळविले. या स्पर्धेत एकूण अट्ठावीस लाख ऐंशी हजार रुपयांची रोख बक्षिसे होती. त्यापैकी पिंपळे सौदागर येथील ड्रीम झी स्केटिंग अकॅडमीचे विद्यार्थी तेजर रैना, हदान गावडे, धीर दिपेश चौहान, ओवी पवार, रतन प्रविण, सारथी सिनारे, आयुष चौहान, रूचिका, ईशान पवार या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे रोख बक्षिस पटकावले. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक राहुल बील्गी, अनुराधा बील्गी, वैभव बील्गी, वंदना बील्गी यांनी मार्गदर्शन केले. हे चारही प्रशिक्षक भारताकडून खेळतात. या स्पर्धेमधून या चारही प्रशिक्षकांची इंडोनेशिया येथे होणार्‍या इंटरनॅशनल रोलर स्पीड स्केटिंग चँपियनशिपसाठी निवड झाली आहे.