पिंप्राळा तलाठी कार्यालयाला घातले हार

0

जळगाव। शहरातील पिंप्राळा परिसर तलाठी कार्यालय गेल्या 15 ते 20 दिवसापासून बंद आहे. यामुळे वैतागलेल्या नागरिकांसह राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या बंद दाराला हार घालत नारळ फोडून अनोखे आंदोलन केले. तलाठी कार्यालया बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नुकताच 12वी 10 वी चा निकाल लागला आणि पालकांना आपल्या पाल्यांच्या अडमिशन साठी दाखल्याची गरज लागणार आहे.वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासन दखल घेत नाही म्हणून आज बुधवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिक नगरसेवक व नागरिकांच्या वतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यासाठी कार्यालयाच्या दारला माल्यार्पण व पूजा करून नारळ फोडून आंदोलन केले. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन दिले.यावेळी नगरसेविका शोभा बारी, प्रतिभा कापसे, लता मोरे, नगरसेवक शरीफ पिंजारी, अतुल बारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.