पिंप्राळा भागात फॉगिंग मशिनद्वारे धुरळणी

0

जळगाव । पिंप्राळा भागात गेल्या काही दिवसात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यू किंवा डेंग्यू सदृश्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. याची दखल घेत नगरसेवक अमर जैन यांनी आज सोमवारी पिंप्राळा भागातील वसाहतींमध्ये फॉगिंग मशिनद्वारे धुरळणी करण्यात आली. महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दोन फॉगिंग मशीन आणून ही धुरळणी करण्यात आली. यावेळी जितेंद्र पाटील, पंकज पाटील, शैलेश पाटील व बंटी राजपूत उपस्थित होते.

संपूर्ण परिसरात होणार धुरळणी
अष्टभुजादेवी परिसर, साईबाबानगर भागात सकाळपासून दुपारपर्यंत धुरळणी सुरु होती. परिसरात तापाचे रुग्ण असल्याचे अनेकांनी यावेळी सांगितले. त्यामुळे घरांच्या काना-कोपर्‍यात धुरळणी करण्याचा आग्रह नागरिकांनी केल्यानंतर घरा-घरात धुरळणी करण्यात आली. तसेच पिंप्राळा परिसरात सर्वत्र धुरळणी करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक अमर जैन यांनी सांगितली. पिंप्राळा परिसरातील धुरळणीची पाहणी महापौर ललित कोल्हे व खाविआ गटनेते सुनील महाजन यांनी केली.