पिंप्राळा येथे केळीचा घड चोरणारा ताब्यात

0

जळगाव। पिंप्राळा शिवारातील शेतातून काही दिवसांपासून केळीचे घड चोरीला जात असल्याचे प्रकार घडत होते. आज बुधवारी चक्क पिंप्राळा येथे शेतातील केळीचे घड चोरणार्‍यास पिता-पुत्रांनी भल्या पहाटे रंगेहाथ पकडला आहे. पिंप्राळा परिसरात शेतातील केळीचे घड चोरून नेण्याच्या व शेतीचे साहित्य चोरून नेण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

बुधवार रोजी सकाळी 4 वाजेच्या सुमारास जयसिंग महादेव पाटील यांच्या शेतातुन कोळी नावाचा इसम केळीचे घड चोरून नेत असतांना आढळून आला. जयसिंग पाटील व त्यांचा मुलगा भरत पाटील यांनी त्यास पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याची विचारपूस करून रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिला.