संतप्त ग्रामस्थांसह सेना पदाधिकार्यांची तहसीलमध्ये धडक
मुक्ताईनगर– तालुक्यातील पिंप्राळा येथील स्वस्त धान्य दुकानातून ग्रामस्थांना वाटप करण्यात येणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे व कीटक-अळीसदृश असल्याने सोमवारी या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलमध्ये धडक दिली. याप्रसंगी धान्य नमूने तहसीलदार रचना पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. संबंधितांवर कारवाई करण्याची व तत्काळ चांगल्या दर्जाचा धान्यपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली तसेच तालुक्यातील इतर गावांमध्ये सुद्धा अशा प्रकारचा पुरवठा होत असल्यास तपासणी करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
शिवसेना तालुकाप्रमुख छोटु भोई, अॅड.मनोहर खैरनार, विधानसभा क्षेतप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख प्रशांत भालशंकर, युवासेना तालुका प्रमुख सचिन पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र हिवराळे, बन्ना पाटील, प्रवीण चौधरी, पंकज पांडव, पिंप्राळा येथील विष्णू झाल्टे, अरुण झाल्टे, संजय कोळी, कृष्णा भोलाणकर, गणेश दहिभाते, निना भोलाणकर, मोहन झाल्टे, रवींद्र झाल्टे, विनोद झाल्टे व सरपंच राखी विनोद झाल्टे व उपसरपंच लता विष्णू झाल्टे, गणेश टोंगे, संतोष कोळी, वसंत भलभले, बबलू वंजारी, शुभम तळेले, शुभम शर्मा यांच्यासह असंख्य शिवसैनिक व पिंप्राळा येथील गावकरी उपस्थित होते.