जळगाव: शहरातील पिंप्राळा हुडकोत दोन गटात दगड फेक, झाल्याची घटना रविवारी रात्री साडे दहा वाजता घडली. या घटनेत तीन जखमी असुन त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रिंपाळा हुडकोत शाळेजवळ अचानकपणे दोन गटात वाद होवुन त्याचे रुपांतर तुफान दगडफेकीत झाले. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ.निलाभ रोहन, रामानंदनगरचे पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. कर्मचार्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला दोन्ही गटा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून काहिंना ताब्यात घेण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस नाईक राजेश भावसार करीत आहे. याठिकाणी सोमवारिही काही कर्मचारी तैनात करण्यात आले होते. घटनेचे नेकमे कारण कळु शकलेले नाही मात्र जुन्या वादातुन घटना घडल्याचे समजते.