जळगाव – शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात गुरूवारी पहाटेच्या सुमारास एका माथेफिरूने तीन चारचाकींच्या काचा फोडल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात नोंद करण्यात आली असून परिसरातीलच संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पिंप्राळा हुडको घरकुल परिसरात राहणारे दीपक शांताराम पाटील यांच्या मालकीची काही चारचाकी वाहने आहेत. बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास त्यांनी चारचाकी क्रमांक एमएच.19.बीएफ.7979, एमएच.06.एबी.2244 व एमएच.19.क्यू.9396 या परिसरातच लावल्या. पहाटे 4 वाजेच्या सुमारास त्यांना कारच्या काचा कुणीतरी माथेफिरूने दगड टाकून फोडल्याची माहिती दिली. दीपक पाटील यांनी याबाबत सकाळीच पोलिसांना माहिती दिली. रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर चौकशी करून राजू सुरेश गायकवाड या संशयिताला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.