जळगाव । पिंप्राळा हुडको रस्त्यावरील कुंटणखान्यावर पोलिसांनी बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास धाड टाकून एका दलालासह तरुणास अटक केली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
पिंप्राळा हुडको रस्त्यावरील महादेव मंदिरानजीकच्या परिसरात कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना मिळाली. या ठिकाणी कुंटणखाना सुरू असल्याची खात्री होताच कारवाईसाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी कुंटणखान्यात एका जणाला ग्राहक म्हणून पाठविले. आत देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खबर त्या ग्राहकाने मोबाइलवरुन पोलीस अधिकार्यांना दिली आणि पोलिसांनी कुंटणखान्यावर धाड टाकली. हा कुंटणखाना दयावान बैरागी व एक महिला चालवत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. याबाबत सहायक्क पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात दयावान बैरागी व दलाल जयेश अग्रवाल (चोपडा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक झाली आहे.
Prev Post