पिंप्राळ्यात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगाव । पिंप्राळ्यातील गांधी चौक परिसरात राहणार्‍या तरूणा राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चंदन भाऊराव महाजन (वय-29) असे मयत तरूणाचे नाव आहे. दरम्यान, शेतीचे कर्ज होवून त्याची फेड न झाल्याने कर्जबारी झाल्याने तरूणाने (शेतकरी) आत्महत्या केली असावी असा अंदाज नातेवाईकांकडून वर्तविण्यात आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दोन वर्षापूर्वीच झाले होते लग्न
रावेर तालुक्यातील खिर्डी येथील चंदन भाऊराव महाजन हे पिंप्राळ्यातील गांधी चौक येथे रविंद्र पाटील यांच्या घरात गेल्या पाच ते सहा महिन्यापासून भाड्याने पत्नी नेहा यांच्यासोबत राहत होते. त्यांचे दोन वर्षापूर्वीच त्यांचे लग्न झाले असून श्रीराम फायनान्स येथे कामाला होता. मात्र, पोटाच्या आजारामुळे त्यांना नेहमी हॉस्पीटलच्या चकरा माराव्या लागत असल्याने त्यामुळे ते सध्या घरीच होते. तसेच त्यांची खिर्डी येथे शेती असल्यामुळे ते शेतीचे कामही करत असत. शेतीसाठी त्यांनी 2 लाख लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी नेहा ह्या पिंप्राळ्यातच राहत असलेल्या त्यांचे वडील राजेंद्र केशव पाटील यांच्याकडे डबा घेण्यासाठी गेल्या होता. तर घराच्या मागच्या खोलीत चंदन हे झोपलेले होते. 10.30 वाजता नेहा ह्या डबा घेवून आल्यानंतर ते घरातील मागच्या खोलीत गेल्यावर त्यांना पतीने गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी आरडा-ओरडा करत बाहेर आल्या.

आजु-बाजुच्या रहिवाश्यांनी घरात धाव घेतल्यानंतर त्यांना चंदन यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. जावयाने गळफास घेतल्याचे कळताच राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नेहा यांनी मनहेलवणारा आक्रेश केला. परिसरातील रहिवाश्यांनी घटनेबाबत रामांनद नगर पोलिस ठाण्यात माहिती दिल्यावर पोलिस कर्मचारी काशिनाथ कोळंबे व किरण पाटील यांनी घटनास्थळी येवून रहिवाश्यांच्या मदतीने चंदन यांना खाली उत्रविले. कोळंबे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.