पिंप्राळ्यात हाणामारी तीन जखमी; परस्परांविरूध्द गुन्हे

0

जळगाव । पिंप्राळ्यातील मयूर कॉलनीत बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास पती, पत्नीचे वाद सुरू होते. परिसरातील महिला आणि तिची बहीण बाजुला उभे राहून वाद बघत होते. त्यावरून वाद होऊन हाणामारी झाली. या प्रकरणी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा आणि हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर कॉलनीत बुधवारी रात्री मनोज वसंत इंगळे आणि त्याच्या पत्नीचे वाद सुरू होते. त्यावेळी परिसरातील एक महिला आणि तिची बहीण बाजुला उभे होते. त्यावेळी मनोज त्याचे भाऊ पांडुरंग आणि गणेश यांनी महिलेला मारहाण केली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मनोज इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे आणि पत्नीचे वाद सुरू होते. त्यावेळी उज्ज्वला विष्णू भालेराव (वय 25), पुजा विष्णू भालेराव या त्या ठिकाणी उभ्या होत्या. त्यांना वाद पांडुरंग इंगळे यांनी भांडण का बघता. असे विचारले असता त्याचा राग येऊन त्यांनी आणि विष्णू धना भालेराव, विकास विष्णू भालेराव यांनी शिविगाळ करून लोखंडी पाइप, सळईने मारहाण करून जखमी केले.