भुसावळ : तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील 45 वर्षीय प्रौढाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धनराज डिगंबर तायडे (45, पिंप्रीसेकम, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे. गुरुवार, 21 रोजी ही घटना घडली. तायडे यांनी गळफास घेतल्यानंतर त्यांना उपचारार्थ जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. तपास एएसआय शामकुमार मोरे करीत आहेत.