पिंप्रीसेकममधील दहा जुगारी जाळ्यात

0
11 हजारांचा मद्यसाठा केला जप्त 
भुसावळ:- तालुक्यातील पिंप्रीसेकम येथे सार्वजनिक जागी पत्त्याचा डाव रंगात आला असतानाच साध्या वेशातील पोलिसांनी धाड टाकत दहा जुगार्‍यांची मुसक्या आवळल्या.
आरोपींच्या ताब्यातून 10 हजार 500 रुपयांच्या रोकडसह जुगाराची साधने जप्त करण्यात आली तर अन्य दुसर्‍या कारवाईत 11 हजारांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचून सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.