पिंप्रीसेकम सरपंचपदी सूर्यवंशी

0

भुसावळ । तालुक्यातील पिंप्रीसेकम ग्रृप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या शालिनी विजय सुर्यवंशी या दहा मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी सुनंदा भिवसन तायडे यांना शून्य मतदान झाले. सरपंच शालिक मोरे यांचा तीन महिन्यांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पद रिक्त झाले होते. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेसाठी सोमवारी निवडणूक झाली. अध्यासी अधिकारी म्हणून एम.आर.दुसाने होते.

त्यांना ग्रामविकास अधिकारी एल.एस.नहाले यांनी सहकार्य केले. सकाळी 10 ते 12 या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. यावेळी शालिनी सुर्यवंशी व सुनंदा तायडे यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. हात उंचावून मतदान घेण्यात आले. सूर्यवंशी यांना दहा तर प्रतिस्पर्धी तायडे यांना शून्य मतदान झाले. प्रसंगी सुनंदा तायडे या अनुपस्थित राहिल्या. रामचंद्र तायडे व पंकज वारके हे सदस्य तटस्थ राहिले. विजयी झालेल्या सुर्यवंशी यांचा ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी सत्कार केला. निवडणूकप्रसंगी तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.