पिंप्री अकराऊतमध्ये दारूबंदीसाठी महिलांची पोलिस ठाण्यावर धडक

0

पिढी व्यसनांच्या आहारी ; दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मुक्ताईनगर- तालुक्यातील मौजे पिंप्रीअकराऊत गावात दारू विक्री खुलेआम सुरू असल्यामुळे गावातील बहुतांश लोक व्यसनाधीन होत असल्यामुळे संतप्त महिलांनी दारुबंदी होण्यासाठी तहसीलदार शाम वाडकर व पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांना निवेदन दिले.

यांची होती निवेदन देताना उपस्थिती
गावातील उषाबाई गजानन कोळी, दौलत रामकृष्ण कोळी व शामराव मांगो कोळी हे सर्रासपणे गावठी व देशी दारू विक्री करीत असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी प्रशासनाकडे केला आहे. गावातील लोकांना दारूचे व्यसन लागत असून बहुतांश तरुण मंडळी दारुच्या आहारी गेल्याचे निवेदनात नमूद आहे. डिगंबर चोपडे, संदीप पाटील व भागवत माळी हे लोक दारू मुळे मरण पावले आहे तर पुरूषोत्तम चोपडे, प्रमोद लोंढे हे लोक मरणाच्या उंबरठ्यावर असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दारुमुळे गावातील सामाजीक स्वास्थ बिघडत असुन गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे. संबंधित दारू विक्रेत्यांवर अंकुश निर्माण करावा तसेच गावातून दारू कायमस्वरुपी हद्दपार करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तहसीलदारांना निवेदन देतांना सरला पिवटे, रजनी खोसे, रुपाली माळी, जिजाबाई पाटील, निर्मला लोंढे तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.