कत्तलीच्या इराद्याने वाहतुकीचा संशय ; दोघांना अटक
मुक्ताईनगर– कत्तलीच्या इराद्याने गुरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वरील पिंपरी अकराऊत फाट्याजवळ संशयास्पद ट्रकची तपासणी केली असता त्यात 47 गुरांची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ट्रक चालकासह दोघांना अटक केली असून अन्य दोघे पसार होण्यात यशस्वी झाले. गुरांची सुटका करण्यात आली असून त्यांची गो शाळेत रवानगी करण्यात आली. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई पिंप्री अकराऊत शिवारातील हॉटेल साईसमोर करण्यात आली.
ट्रक चालकासह दोघांना अटक
पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिंप्री अकराऊत शिवारातील हॉटेल साईसमोर नाकाबंदी करण्यात आली. ट्रक (एच.आर.55 एच.7258) द्वारे गुरांची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचे व वाहतुकीबाबत परवाना नसल्याने ट्रकमधील सलीम मुन्ना न्यारहारगर व लियाकत मुस्ताक फोपालिया (दोन्ही रा.मुल्तानपुरा, बडवालदरा, ता.जि.मनमाड, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली. अन्य दोन संशयीत पसार होण्यात यशस्वी झाले. अंकुश काळे, आदित्य सापधरे , सागर तळेले, रीतेश सोनार, आकाश सापधरे, विजय पोलाखरे, पवन सोनवणे आदी ग्रामस्थांसह संजय लाटे, संतोष नागरे, किरण शिंपी, संजय लाटे, हेमंत महाजन, मारुती मारुती भंगे, लतीफ तडवी, रवींद्र तायडे व पोलीस कर्मचार्यांनी गुरे ट्रकमधून बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले. गुरांची गजानन गो शाळेत रवानगी करण्यात आली. पोलीस नाईक संतोष केशव नागरे यांच्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.