मुक्ताईनगर : तालुक्यातील पिंप्री अकराऊत शाळेतील शिक्षकाला ऑनलाईन 67 हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार अल्तमश शमशुद्दीन मो.जिलानी (32, मणियार मोहल्ला, मुक्ताईनगर) हे पिंप्री अकराऊत शाळेत शिक्षक आहेत. भामट्याने तक्रारदाराच्या मोबाईलवर ऑनलाईन कंम्लेंट अॅप पाठवून फिर्यादीच्या खात्यातून 66 हजार 185 रुपयांची रोकड वळती केली. तपास प्रभारी निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करीत आहेत.