चाळीसगाव । एम.आर.इ.जी.एस. अंतर्गत यंत्रणास्तरावर असलेले काम मजुरांच्या हस्ते न करता जेसीबीच्या सहाय्याने पुर्ण केल्याबाबत तक्रार करून देखील कारवाई न झाल्याने तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील शिव रस्त्याचे कामाचे बील अदा करू नये तसे झाल्यास कार्यकत्यार्ंसह उपोषणास बसण्याचा इशारा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष तथा पिंप्री खुर्दचे माजी सरपंच नानाभाऊ नामदेव पवार यांनी तहसीलदार चाळीसगाव यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मौजे पिंप्री खुर्द ता चाळीसगाव या ठिकाणी शासनमान्य शिव रस्त्याचे काम एम.आर.इ.जी.एस. अंतर्गत मजुरांकडून करण्याचा नियम असतांना देखील काही संधी साधू तसेच स्वत:चे हित साधनारे अधिकारी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी संगनमत करून निर्देशित काम स्वत:च्या अखत्यारित ज्यावर शासनाचे नियंत्रण असतांना देखील कोणत्याही तक्रारीला ग्राह्य न धरता स्वत: च्या मनमानी ने मुजोर अधिकार्याच्या अधिपत्याखाली ज्याचा या कामाशी काहीही संबंध नाही असे ज्युनिअर इंजिनिअर शर्मा रावसाहेब जे धरणगाव तालुक्यात कार्यरत आहेत त्यांनी निर्देशित ठिकाणी येऊन स्वत:च्या अधिपत्याखाली बिलाची हमी देऊन जेसीबीद्वारे निर्देशित गावातील शिव रस्त्याचे काम पुर्ण केले. आपणास पुनश्च तक्रार करून झालेल्या कामाचे बील अदा करण्यात येऊ नये तसे झाल्यास ते त्यांचे कार्यकर्ते आमरण उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आला आहे.