रावेर – तालुक्यातील पिंप्री येथुन अज्ञात चोरट्यांनी 2 बैलांची चोरी केल्याची घटना आज मध्यरात्री घडली. याबाबत वृत्त असे की, पिंप्री येथील रहिवासी रफसान रसिद तडवी यांनी त्यांचे 30 हजार रुपये किमतीचे भुरकट रंगाचे बैल काशीनाथ महाजन यांच्या वाड्यात बांधले होते. परंतु मध्यरात्री कोणी तरी अज्ञात चोरटयांनी बैलजोडी सोडून चोरुन नेली आहे. याबाबत अज्ञात चोरटयां विरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस नाईक खंडाळे करीत आहे.