पिंप्री येथे गावठी भट्टीवर धाड : एक लाख 30 हजारांचे रसायन नष्ट

यावल : तालुक्यातील पिंप्री गावाजवळील तापी नदीकाठी अवैधरीत्या सुरू असलेल्या गावठी दारू भट्टीवर यावल पोलिसांनी धाड टाकत एक लाख 30 हाजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे अवैधरीत्या गावठी दारूची विक्री करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली.

भल्या पहाटे पोलिसांची कारवाई
मंगळवारी पहाटे पिंप्री गावाजवळील तापी नदीच्या काठी अचानक छापा टाकल्यानंतर आठ जणांना अवैधरीत्या गावठी दारूची भट्टी चालवताना पकडण्यात आले. लालचंद भास्कर कोळी यांच्याकडून 17 हजारांचा, आकाश रामकृष्ण कोळी यांच्याकडून 16 हजारांचा, राकेश मधुकर कोळी यांच्याकडून 17 हजारांचा, आकाश श्रावण कोळी यांच्याकडून 15 हजारांचा, सचिन सुभाष कोळी यांच्याकडून 16 हजारांचा, रतीलाल हरी कोळी 15 हजारांचा, प्रकाश अशोक सोनवणे (सर्व रा.भोलाणे, ता.जळगाव) यांच्याकडून 14 हजारांचा तसेच भास्कर पुंडलिक कोळी (पिंप्री) यांच्याकडून 17 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आशीत कांबळे, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार सिकंदर तडवी, किशोर परदेशी, अशोक बाविस्कर, सहाय्यक फौजदार असलम खान, हवालदार अशोक जवरे, बालक बार्‍हे, संदीप सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली. ध्ये खळबळ उडाली आहे.

यावल शहरातही कारवाई
यावल शहरातील बोरावल गेट भागातदेखील कारवाई करीत बंडू सुकलाल पाटील यांच्याकडून एक हजार 500 रुपयांची गावठी दारू तर ज्ञानेश्वर जनार्दन कोळी यांच्याकडून 525 रुपये किंमतीची अवैद्य देशी दारू जप्त करण्यात आली.