पिकांवर फवारणी करतांना दोघांना विषबाधा

0

जळगाव – शेतातील पिकांवर फवारणी करत असतांना वेगवेगळ्या घटनेत दोघांना विषबाधा झाले असून दोघांना जिल्हा सामान्य
रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. याबाबत माहिती अशी की, फुलसिंग मोहन राठोड (वय-45) रा. पातड तांडा ता. जामनेर हे
शेतातील कपाशीवर फवारणी करत असतांना त्यांना चक्कर येवून विषबाधा झाली. मित्रांनी त्यांना 108 ने जिल्हा सामान्य रूग्णालयात
उपचारार्थ दाखल केले तर दुसऱ्या घटनेत मंगेश भरत मंगेश भोलाणकर (वय-27) रा. राजूरा मुक्ताईनगर हे देखील त्यांच्या स्वत:च्या
शेतात पिकांवर फवारणी करत असतांना विषबाधा झाल्याने त्यांना खासगी वाहनाने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी भरती केले
आहे. उपचारानंतर दोघांची प्रकृतीस्थिर आहे.