आतापर्यंत 6 जणांना अटक ; तीन राज्यात धागेदोरे
शहादा । महिला व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली बुुंदी (राजस्थान) येथून चार तर भुसावळ येथून एक अशा पाच आरोपींना शुक्रवारी रात्री ते शनिवार पहाटेपर्यंत शहादा पोलीसांच्या दोन स्वतंत्र पथकाने बेड्या ठोल्या. या प्रकरणी यापाचही आरोपींना न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 10 जानेवारी 2017 रोजी शहरातील भाजी मंडई परिसरातील रेड लाईट भागात पुणे येथील रेस्क्यू फाऊंडेशन व शहादा पोलीसांनी छापा टाकून या भागात चालणार्या वेश्या व्यवसायावर कारवाई केली होती. पिटा व पोस्को काद्यान्वये दाखल या गुन्ह्या संदर्भांत सर्वोच्य न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर या गुन्ह्यातील आरोपींना अटक कर्यासाठी उपविभागीय पेालीस अधिक्षक महारू पाटील व पोलीस निरीक्षक संजय शुक्ल यांनी तीन स्वंतत्र पथकांची निर्मिती केली असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थान या भागात तपसा करीत आहेत. या तपास पथकाताच्या कारवाईतून गेल्या तीन दिवसात पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलीसांना यश आले आहे.
तीन स्वंतत्र पथकांची निर्मिती
गुरूवारी सर्वात प्रथम शहादा येथील पुंडलीक मराठे यास पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर शुक्रवारी रात्री बुंदी (राजस्थान) येथून जगमोहन ईश्वरलाल छाडी यास तर शनिवारी पहाटे भुसावळ येथून जावेद नुरमोहम्मद फकीर टोक(राजस्थान) येथून रमणसिंग बच्चनसिंग करमावद व ममताज बच्चनसिंह करमावद, बुंदी, राजस्थान येथून राजंती उर्फ कालीप्रधान करमावद यांना पोलीसांनी अटक केली. या पाचही आरोपींना नंदुरबार जिल्हा न्यायाधीश अमय वाघवसे यांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने पाचही संशयीतांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शहादा येथील रेड लाईट भागाता राजस्थान, मध्यप्रदेश व राज्यातील वेगवेगळ्या भागातून वेश्याव्यवसायासाठी मुली व महिलांना कोणी व कसे आणले याचा तपास पोलीसांकडून सुरू आहे. या प्रकारणाची तीन राज्यात तपास सुरू असल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढली असून याप्रकरणी अजून किती आरोपींची धरपकड होते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.