पिडीतेच्या कुटुंबियांची ना.महाजन यांनी घेतली भेट

0

सावदा । येथे अत्याचार झालेल्या पिडीत गतिमंद अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती यानंतर समाजातून या घटनेबाबत तीव्र असंतोष होता. आरोपीस अगोदरच अटक झाली असली तरी त्यास कडक शासन व्हावे अशी मागणी सर्वच स्तरातून उमटत आहे, या पिडीत कुटुंबियांची भेट अनेक जाणानी घेऊन त्यांना सांत्वना दिली याच पिडीत कुटुंबियांची भेट शुक्रवार 20 रोजी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांचे सोबत आमदार हरिभाऊ जावळे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सतीश बेंडाळे, गजानन ठोसरे, नेहा गाजरे, अलका पाटील आदी उपस्थित होते.

पिडीत कुटुंबियांना दिला धीर
यावेळी उपस्थित महिलांनी सदर आरोपीस कडक शासन व्हावे अशी एकमुखी मागणी केली. तसेच पिडीतेने पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यावर तिचे घरच्यांना देखील धमकाविण्यात आले व यामुळेच सदर मुलीने आपले जीवन संपवले असल्याची प्रतिक्रिया उमटली, दरम्यान ना. महाजन यांनी सावदा पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना सदर प्रकरणाचा तपास अगदी योग्य करा जेणे करून यातील आरोपीस सुटण्यास कोठेही जागा नसावी. त्यास कडक शासन व्हावे अश्या सूचना दिल्या पिडीत कुटुंबियांनी धीर धरावा खचून जाऊ नये आम्ही सर्व आपले पाठीशी आहोत असे देखील सांगितले.