शहादा। तालुक्यातील कळंबू गावाच्या जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहे.जनतेच्या कामासाठी व प्रशासकिय कामांसाठी होणारे पत्रव्यवहार करण्यासाठी ग्राम विकास अधिकारी बी.बी.देसले यांच्या मनमानी निर्णयामुळे गावास वेठीस धरले जात आहे.समस्यांचे निराकरण होत नाही तोवर उपोषण सोडणार नाही असा इशारा कळंबु ग्रामपंचायत सरपंच अमरजित बाबुराव कुवर यांनी दिला आहे.शहादा पंचायत समिती आवारात गुरूवारपासून उपोषणास सुरवात झाली आहे. गटविकास अधिकार यांना दिलेल्या निवेदनावर ग्रा.पं.सदस्य यांनी म्हटले आहे की,कळंबु गावास तापी नदी व म्हैस नदीच्या संगमावरून जँकवेलवरून पाणी पुरवठा होत असून सदरचे पाणी क्षारयुक्त प्रमाण जास्त आहे.त्या आशयाची लेखी पाणी गुणवत्ता जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा यांच्या पाणी नमुऩ्यास सुक्ष्म अहवालानुसार सदर पाणी पिण्यास घातक आहे.ग्रामस्तरावर नागरीकांना पिण्यासाठी शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी.
विकासकामाकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष
यासाठी ग्रा.प.स्तरावर 14 वित्त आयोगातून कृती आराखडाप्रमाणे फिल्टर प्लान्ट बसविणे व जुनी योजना म.जि.प्रा.ची पाईप लाईन जोडणेबाबत निधी उपलब्ध असतांना सुद्धा माजी ग्राम विकास अधिकारी पंकज शिवाजी सोनवणे याने वर्षभरात योजना सुरू न करता ग्रामस्थांना तापी नदी पाञातून पाणी आणण्यास भाग पाडले होते.दि.1 जूनपासून आलेले नविन ग्राम विस्तार अधिकारी बी.बी.देसले यांनी महिना संपला तरी मासिक बैठक घेतल्यावर सुद्धा विकास कामांना चालना दिली नाही.देसले यांच्याकडे या ग्रामपंचायतीचा अधिक भार पडत असल्याने त्यामुळे विकास कामाकडे हेतुता दुर्लक्ष केले.परिणामी जनतेच्या समस्या वाढल्या आहेत.ग्रामसेवक अभावी नियोजीत व महत्वाची पञ व्यवहार प्रशासनाशी होत नाही.तरी जनतेच्या महत्वाची व निगडीत समस्या दूर करावी.अन्यथा उपोषण सोडणार नाही असा इशारा सरपंच अमरजित कुवर यांनी दिला असून सुकदेव माळी,उपसरपंच मंगलाबाई,सदस्य कमलबाई,सदस्या शेवंताबाई जाधव, सदस्या कागूबाई कुवर यांनी निवेदनावर सह्या करून पाठींबा दर्शविला.