पिता पुत्रांवर इलेक्ट्रीक साहीत्य चोरल्याचा गुन्हा

0

चाळीसगाव – तालुक्यातील उपखेड शिवारातील शेतातील विहीरीतील ईलेक्ट्रीक मोटारचे 4800 रुपये किमतीचे साहीत्य चोरणा-या उपखेड येथील दोघांवर मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील उपखेड येथील कैलास मारुती पाटील (वय-30) यांच्या उपखेड शिवारातील शेतातील विहीरीतील इलेक्ट्रीक मोटारचे साहीत्य त्यात 1000 रुपये किमतीचे स्टार्टर, 500 रुपयाचे ऑटो स्वीच, 300 रुपयाचे कट आऊट, 2 हजार रुपयाची तांब्याची सर्व्हिस वायर, 1 हजार रुपये किमतीची स्टार्टर पेटी असा एकुण 4800 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्या शेताच्या शेजारी शेती असलेले उपखेड गावातील आरोपी विश्‍वास सुपडु कापडणे, दिपक विश्‍वास कापडणे यांनी 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता चोरुन नेल्याचे त्यांचे सालदार भाऊसाहेब रमेश सोनवणे, दिपक विश्‍वास कापडणे यांनी सांगीतल्या वरुन कैलास पाटील यांची खात्री झाल्याने त्यांनी दोघा संशयीत आरोपीविरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला वरील वस्तु चोरुन नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास हवालदार शालीग्राम कुंभार करीत आहेत.